Principal Message
समाज परिवर्तनाच्या वाटेवरील शिक्षक मित्रांनो .......
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्याचे वैभव म्हणजे आदर्शवादाचे स्फुल्लिंग सतत जागृत ठेवणारा तासगाव हा एकमेव तालुका आहे. तासगावच्या शेतकरयांनी हा तालुका द्राक्ष उत्पादने, बेदाणा निर्मितीद्वारे जगाच्या बाजारपेठेत आपला एक ठसा उमटविला आहे.इथला शेतकरी खुप कष्टाळु आहे तसाच तो निसर्गाबरोबर मैत्री करुन उत्पादन वाढ्वणारा शेतकरी देशाचे वैभव आहे.
तासगाव शहराला ऎतिहासिक वारसा असुन तासगाव शहरात उजव्या सोंडेचा गणपती नवसाला पावणारा आहे.या गणेशाच्या नगरीत व तासगाव परिसरातील शिक्षकांचे ट्रेनिंग कॉलेज म्हणुन १३-०६-१९६० पासुन
अध्यापक जुनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव(दत्तमाळ) सुरु झाले आहे. तासगाव परिसरात एक नावाजलेले अध्यापकांचे महाविद्यालय आज यशाच्या गिरीशिखरावर असुन या शाखेने नुकताच सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे.
"ज्ञानवर्धन,ज्ञानसंवर्धन व ज्ञानदान" याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहुन सरस्वतीची म्हणजेच चैतन्याची अखंड उपासना करणारे थोर समाज शिक्षक म्हणजे बापुजी - गोविंदराव ज्ञानोजी साळुंखे युगानुयुगाच्या अंधाराला प्रकाशाचे शक्तिमान वरदान देण्यात संपुर्ण आयुष्यच झोकुन देणार्य़ा डॉ. बापुजी साळुंखे यांनी पावित्र्य मांगल्य व नैतिक मुल्यावर श्रद्धा ठेवुनच वाटचाल केली.
"ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार"
या ध्येयाने समाजाचे शैक्षणिक विचारसरणीतुन परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांनी केले. ज्ञान विज्ञानाची सुसंस्काराशी गाठ बांधुन समाजाला एकसंघपणे ठेवण्याचे महान कार्य प.पु. डॉ. बापुजी साळुंखे यांनी केले आहे. ज्ञानापासुन शतकानुशतके वंचित असणार्या सामाजिक स्तरांच्या आत्मोन्नतीसाठी स्वताःला वाहुन घेतले.
हिंदु संस्कृतीचा आणि अध्यात्माचा सार्थ अभिमान बाळगणार्या स्वामी विवेकानंदांच्या नावाने
"श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था"
सुरु केली. प.पु. डॉ. बापुजी साळुंखे हेच या संस्थेचे संकल्पक,संस्थापक व कार्याध्याक्ष होते. त्यांचे जीवन व शैक्षणिक कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. सत्य, प्रामाणिकपणा,चारित्र्य,पिळवणुक प्रवृत्तिस आळा,सेवा आणि त्याग या जीवनातील मौलिक निष्ठांची पंचसुत्री शिक्षणाच्या माध्यामातुन माणसाच्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला तसेच प्राचीन काळातील गुरुपरंपरेला धरुन शिक्षक कार्यकर्ते म्हणजेच गुरुदेव कार्यकर्ते यांच्या आदर्श जीवनाच्या धड्यातुनच नवीन शिक्षण निर्माण करण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला. बापुजींनी शिक्षणव्यवस्थेमध्ये विद्यार्थी हाच केंद्रबिंदु मानला होता. त्याच्याद्वारेच देशाची जडण-घडण योग्यरीतीने होऊ शकेल असा ध्यास बापुजींनी घेतला होता.
विर्ध्यांच्याबाबत बापुजींना कमालीची आस्था होती.विध्यार्थांविषयी ते म्हणतात "प्रत्येक विद्यार्थी मुलतः सतप्रवृत्त, संवेदनक्षम, सत्यपुजक व ज्ञानशोधक असतो."सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे तणाव त्याच्या मुळच्या प्रवृत्तिमध्ये विकार आणतात. विद्यार्थी विकारशील असु नये. त्याला सामाजिक व राष्ट्रीय जवाबदारीची जाणिव शिक्षकानी करुन दिली पाहीजे.
अध्यापकासाठी बापुजींनी श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यामातुन ८ डी.टी.एड. कॉलेज व ३ बी.एड. कॉलेज निर्माण केली. या अध्यापकांच्या महाविद्यालयामुळे संस्थेतील आवश्यक असणारा गुरुदेव निर्माण केला. शिक्षकाच्या अंगी असणार्या सर्व गुणांना वाव देवुन समाजनिर्मीतिचा ध्यास घेणार्या बापुजींना आपल्याच विध्यार्थांसाठि आपणच निर्माण केलेले शिक्षक संस्थेत निवडले त्यामुळे शिक्षकाच्या अंगी असणारी पंचशील तत्वे बापुजींच्या अथक प्रयत्नातुन समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविता आली.
या अध्यापक जुनिअर कॉलेज मध्ये विविध उपक्रमाद्वारे विध्यार्थांच्या सुप्तशक्तिंना वाव दिला जातॊ. वक्तृत्व, निबंधस्पर्धा,चित्रकलास्पर्धा,वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य लेखनास प्रवृत्त केले जाते.१२ ते १९ जानेवारी श्री स्वामी विवेकानंद सप्ताह साजरा केला जातो यामध्ये कॉलेजस्तर,जिल्हास्तर, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत विद्यार्थी विविध स्पर्धा मध्ये भाग घेउन आपल्य अंगच्या कलागुणाने नेत्रदिपक यश संपादन करतात. यावर्षी चित्रकला,निबंध स्पर्धा मध्ये विध्यार्थांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक राज्यस्तरावर मिळवीला आहे.
या कॉलेज मध्ये सध्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे.देशभरात मुलींच्यावर होणारे शोषण आणि अन्यायाचे प्रकार विचारात घेउन मुलींना सक्ष्मपणे येणार्या संकटाशी सामना करता यावा म्हणुन "मार्शल आर्ट" सुरु केले आह्वे.विध्यार्थांच्या कलागुणाना संधि देण्यासाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते.सर्व प्रशिक्षणार्थी या सांस्कृतीक कार्यक्रमात आनंदाने सहभागी होतात.
प्रथम वर्ष डी.टी.एड. साठी समाजसेवा शिबीर, द्वितीय वर्ष डी.टी.एड. साठी छात्रशिक्षक सेवाकाळ शिबीराचे आयोजन केले होते. ग्रामस्थ, शिक्षण विभाग,प्रशिक्षणार्थी व प्राध्यापक या सर्वांच्या विचारातुन आदर्शवत शिबीर पार पाडले जाते.शिबीरार्थी समाजसेवा म्हणुन गावातील रस्ते,समाजमंदीर स्वछ करण्याचा उपक्रम करतात.शालेय अध्यापनमध्ये शैक्षणिक साधनाद्वारे अध्यापनाच्या तयारीचे नेटके संयोजन करुन हे शिबीर १५ दिवस स्वतःच अधिकारी आणि स्वतःच शिक्षक बनुन पुर्ण करतात.
क्रीडा स्पर्धा जिल्हा व राज्यस्तरावर पार पाडल्या जातात. या कॉलेजच्या विध्यार्थांनी क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवीले आहे.सहशालेय उपक्रमामध्ये हे कॉलेज नेहमीच आघाडीवर राहिले आहे.
या कॉलेजनधील माझे सर्व सहकारी, प्राध्यापक, सेवक अतिशय तळमळीने आपल्य कार्यामध्ये सहभागी होतात. सर्व प्राध्यापक आपापल्या विषयात पारंगत आहेत.सेवक सुद्दा दिलेली जवाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडतात.
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हि आपल्या राज्याचे भुषण आहे. ३७५ संस्कार केंद्रांचा व्याप सांभाळुन समाजाची जडण घडण करणारी हि शक्ती समाजाच्या हितासाठी अहोरात्र कार्यमग्न आहे. या संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव,विभागप्रमुख, आजिव सेवक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक ,सेवक हे सर्व आमच्या संस्थेचे कुटुंबीय आहेत. हे सर्व कुटुंब म्हणजे वसुधैवकुटुंबकम आहे याचा मला अभिमान आहे.
सर्व आजी माजी विद्यार्थी हे आमचे वैभव आहे. या वैभवाने महाराष्ट्राला वैभवशाली बनवीण्याचा ध्यास घेतला आहे म्हणुन सर्वात महान सर्व राज्यात अग्रेसर महान राष्ट्र महाराष्ट्र होय.